ढगांना चिरत विमानाने केली शानदार एंट्री, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


तुम्ही विमान उडतानाचे अनेक व्हिडीओ बघितले असतील. विमानाचे अनेक किस्से देखील ऐकले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका विमानाच्या व्हिडीओबद्दल सांगणार आहोत, जो बघून तुम्ही देखील आश्चर्य चकित व्हाल. ढगांच्या मधून निघणाऱ्या या विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एमिरेट्स एअरलाईन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून एका विमानाचा लँड होण्याआधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विमान शानदार पध्दतीने ढगांना चिरत बाहेर येत आहे. व्हिडीओ बघून असे वाटत आहे की, जणू विमान ढगांना कापतच बाहेर निघत आहे.

हा व्हिडीओ लंडन गेटविक विमानतळावरचा असल्याचे सांगितले जात आहे. 11 सेंकदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक वेळा बघितला गेला आहे. काही लोक याला विमानाची शानदार एंट्री असल्याचे म्हणत आहेत. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

Leave a Comment