गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी थेट प्लॅटफॉर्मवर घातली रिक्षा


जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात. एक म्हणजे जे नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी मागे हटतात व दोन म्हणजे जे कोणाचीही मदत करण्यासाठी नेहमी पुढे येतात. जगामध्ये दुसऱ्या प्रकारातील लोक खुप कमी बघायला मिळत असतात. मुंबईच्या रिक्षाचालकाने असेच काहीसे केले आहे, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रिक्षाचालकाने एका गर्भवती महिलेला अगदी वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचवले.

महिलेचा पती रिक्षा घेऊन विरार रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा होता. ज्या लोकल ट्रेनने गर्भवती महिला येणार होती ती सर्वत्र पाणी साचले असल्यामुळे रद्द झाली. महिलेला होणार त्रास बघून पतीने रिक्षाला थेट स्टेशनमध्ये घातले. यावेळी त्या रिक्षाचालताने देखील त्यांची मदत केली.

रिक्षाचालकाने थेट प्लॅटफॉर्मच्या गर्दीमध्ये रिक्षा पळली आणि महिलेला बसवत तिला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी कायदा तोडल्याने रिक्षाचालकाला अडवले. मात्र रिक्षामध्ये गर्भवती महिला असल्याने त्याला सोडून दिले. त्यानंतर आरपीएफने ड्रायव्हरला अटक केली. त्यानंतर कोर्टाने चेतावणी देत त्याला सोडून दिले. ट्विटरवर लोक या रिक्षाचालकाचे कौतुक करत आहेत.  त्याला हिरो म्हणत आहेत.

Leave a Comment