ट्विटरवर #PMModiOnDiscovery’ ने रचला नवा इतिहास


डिस्कव्हरी चॅनेलसाठी मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा प्रोमो वादळ निर्माण करीत आहे. हा प्रोमो ट्विटरवर या शोचा होस्ट बेयर ग्रिल्स याने पोस्ट केल्यापासून हे वादळ घोंगाऊ लागले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसात ट्विटरचे जग जिंकले आहे. मोदी यांनी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये बेयर ग्रिल्ससोबत जंगलात भटकंती केली होती. यात दोघांची पर्यावरणासंबंधीच्या अनेक मुद्द्यावर चर्चा झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे. ट्विटरवर #PMModiOnDiscovery हा हॅशटॅग हा एखाद्या टीव्ही शोसाठी सर्वाधिक वापरला गेलेला टॅग बनला आहे. केवळ १२ तासात ७२८ दशलक्ष लोकांनी हॅशटॅग केले. मेल्टवॉटर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यम संस्थेने ही माहिती दिली आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर १२ ऑगस्टला मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो प्रसारित होणार आहे.

Leave a Comment