‘या’ दिवशी रिलीज होणार ‘छिछोरे’चा ट्रेलर


पहिल्यांदाच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ही जोडी स्क्रिन शेअर करणार आहे. दोघेही आगामी ‘छिछोरे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मागील काही दिवसांपासून सुरू होते, त्यातच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.


चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची तारीख चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी जाहीर केली आहे. मैत्रीदिन म्हणून ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार साजरा केला जातो. चित्रपटाचा ट्रेलर याच दिवशी म्हणजेच ४ ऑगस्टला रिलीज करण्यात येणार असून याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

‘छिछोरे’ हा कॉमेडी चित्रपट असणार आहे. नितेश तिवारी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होणार आहे. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूतशिवाय चित्रपटात वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

Leave a Comment