भारतीय संघ आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर


नवी दिल्ली – भारतीय स्क्वॅाश रॅकेट महासंघाच्या एका प्रशासकीय चुकीमुळे टीम इंडियाच्या स्क्वॅाश पुरुष संघाला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही.

दर दोन वर्षात होणाऱ्या या चॅम्पियनशिपसाठी महासंघाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी घेतली नसल्यामुळे हा प्रकार घडला अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कोणतीही बैठक या प्राधिकरणाकडून होऊ शकली नाही. या बैठकीला अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे टीम इंडियाची नोंदणी होऊ शकली नाही आणि त्याचा तोटा खेळांडूना सहन करावा लागला.

Leave a Comment