चटकदार पाणीपुरी समोर येताच सोनाक्षी सिन्हाला पडला डायटचा विसर


भेळ, पाणीपुरी म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. इतकेच काय तर अगदी ‘डायट कॉन्शस’ मंडळींना देखील चटकदार पाणीपुरी पहिली, की ती चाखण्याचा मोह आवरत नाही. असेच काहीसे बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या बाबतीतही घडले. ‘दबंग’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या सोनाक्षीने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या आहारपद्धतीवर आणि व्यायामावर खूपच लक्ष केंद्रित केले असून, त्यायोगे कोणत्याही तरुणीला हेवा वाटेल अशी उत्तम फिगर मिळविली आहे. सोनाक्षी अभिनीत ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, सध्या सोनाक्षी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अलीकडेच सोनाक्षीचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, या मध्ये आपली मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांच्या समवेत, एरव्ही अतिशय डायट कॉन्शस असणारी सोनाक्षी पाणीपुरीवर मनसोक्त ताव मारताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या ‘फॅन क्लब’ द्वारे हा व्हिडियो सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडियोमध्ये सोनाक्षी स्वतःच्या हातांनी पाणीपुरी बनवून घेऊन त्यांच्या आस्वाद घेताना दिसत आहे. सोनाक्षीचा पाणीपुरी खातानाचा हा व्हिडियो पाहून सोनाक्षीच्या चाहत्यांनी देखील यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडियोमध्ये सोनाक्षी ‘खानदानी शफाखाना’ या तिच्या आगामी चित्रपटातील तिचे सहकलाकार बादशाह आणि वरूण शर्मा यांच्या बरोबर पाणीपुरीच आस्वाद घेताना दिसत आहे. सोनाक्षी अभिनीत ‘खानदानी शफाखाना’ दोन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिल्पी दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा विषय चाकोरीपेक्षा काही तरी वेगळा असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आधीच प्रदर्शित झाले असून या चित्रपटातील गीतांना देखील दर्शकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Leave a Comment