… आणि नदीमध्ये पाच मजली इमारत अचानक तरंगू लागली


आतापर्यंत तुम्ही नदीमध्ये नाव अथवा जहाज तरंगताना बघितले असेल. मात्र जरा विचार करा 5 मजली इमारत नदीमध्ये तरंगू लागली तर ? हे दृश्यबघून तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्य वाटेल. चीनमध्ये इमारत तरंगणारे असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले.

ट्विटरवर एका युजर्सने 11 सेंकदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  या व्हिडीओमध्ये एक पाच मजली इमारत चीनच्या यांगत्सी नदीमध्ये तरंगताना दिसत आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 35 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजर्सने लिहिले की, ही घटना नोव्हेंबर 2018 ची आहे. यामध्ये 5 मजली इमारत नदीमध्ये तरंगताना दिसत आहे.  वास्तविकमध्ये हे एक रेस्टोरंट आहे. नियमांमध्ये बदल केल्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर रेस्टोरंट हलवले जात आहे. यासाठी अनेक नावांना एकत्र जोडले गेले व त्यावर रेस्टोरंटला ठेऊन हलवण्यात आले.

Leave a Comment