200 जणांना डेट केल्यानंतर महिलेने अखेर कुत्र्याशी केले लग्न


सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ व्हायरल होण्यामागे देखील कारणच तसे भन्नाट आहे. 49 वर्षीय माजी स्विमसूट मॉडल एजिलाबेथ होडने आपल्या कुत्र्याशीच लग्न केले आहे. या कुत्र्याचे वय 6 वर्ष आहे. विशेष म्हणजे जगभरातील लोकांनी हे लग्न लाईव्ह बघितले. ब्रिटनचा प्रसिध्द टिव्ही शो द मॉर्निगने या लग्नाचे लाईव्ह प्रेक्षपण केले.

एलिजाबेथ होडचे अनेक जणांबरोबर संबंध होते. तसेच सांगण्यात येते की, मागील काही वर्षांमध्ये तिने 200 पेक्षा अधिक जणांशी डेट केले आहे. मात्र तिला अखेर खरे प्रेम सापडले नाही. त्यामुळे तिने कुत्र्याची जोडीदार म्हणून निवड केली.

एलिजाबेथला 25 वर्षांची मुलगी देखील आहे.  एलिजाबेथचे म्हणणे आहे की, आता तिला कोणत्याही पुरूषाची गरज नाही. आता ती संपुर्ण आयुष्य कुत्र्याबरोबर घालवणार आहे.

द मॉर्निंगने आपल्या ट्विटर हँडलद्वारे या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक वेळा बघितला गेला आहे. तसेच व्हिडीओला 5 हजार पेक्षा अधिक लाईक्स आले असून, 2000 जणांनी रिट्विट केले आहे.