वॉटरपार्कमध्ये अचानक आली ‘त्सुनामी’, 44 जण जखमी


उत्तर चीनमधील एका वॉटरपार्कमधील वेव मशीनचे त्सुनामीमध्ये परिवर्तन झाल्याने 44 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी घडली आहे. शुईयुन वॉटर पार्कने सांगितले की, वेव मशीन व्यवस्थित काम करत नव्हती. मात्र सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे की, मशीन चालवणारा कर्मचारी पिलेला होता. मात्र तो पिलेला नव्हता असे, वॉटर पार्ककडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, मशीनद्वारे येणारी लाट मोठी होत गेली. आणि पाण्यात खेळत असलेले लोक ओरडू लागले. वयोवृध्द ओरडत होते तर लहान मुलं रडत होती. काही लोक लाट जोरात येताच बाहेर पळाले.

एका महिलेला लाटेने ग्राउंडवर फेकले. या घटनेनंतर वॉटरपार्क बंद करण्यात आला असून, घटनेची चौकशी सुरू आहे.

Leave a Comment