उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी बरळली पायल रोहतगी


लखनऊ – उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणीची प्रकृती गंभीर असल्यामुळे याप्रकरणी आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले असून अभिनेत्री पायल रोहतगीने या वादामध्ये उडी घेतली आहे. कुलदीप सिंह सेंगर यांचे पायलने एक व्हिडीओ शेअर करत समर्थन केले आहे. तिला तिच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

एखाद्या बॉलिवूड चित्रपटातून या बलात्काराची कथा घेतल्यासारखेच वाटत आहे. भाजप असो किंवा अन्य कोणताही पक्ष सोशल मीडियाच्या युगामध्ये ते उघडपणे कोणीही दादागिरी करु शकत नाही. तो एकतर आधीच तुरुंगात होता, असे करून तो स्वतः भोवतीच फास आवळत आहे. कुलदीप सिंह सिंगर मुर्ख थोडीच आहेत, स्वत:वरच जे असे संकट ओढवून घेतील. खरे तर हे भाजप पक्षातील आमदार किंवा मान्यवर लोकांविरोधात रचलेले कारस्थान असल्याचे म्हणत हा व्हिडीओ पायलने शेअर केला आहे.

तिने या व्हिडीओमध्ये साक्षी मिश्रा प्रकरणाचाही उल्लेख केला असून प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण वाढवून दाखविल्याचे तिने म्हटले आहे. त्याचबरोबर वृत्त वाहिन्यांना ‘भारतीय माध्यमांचे काका आणि काकू’ असे तिने म्हटले आहे. पायलच्या या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे.

Leave a Comment