‘बाबा’ होणार आहे अजिंक्य रहाणे


नवी दिल्ली – लवकरच भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे ‘बाबा’ बनणार आहे. ही माहिती त्याने सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत दिली आहे. अजिंक्य रहाणे पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आपली गरोदर पत्नी राधिका हिच्यासोबत दिसत आहे.

View this post on Instagram

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on


26 सप्टेंबर 2014 रोजी अजिंक्य रहाणे आणि राधिका हे विवाहबंधनात अडकले होते. अंजिक्य रहाणेला नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यामध्येही रहाणेची फक्त कसोटी संघात वर्णी लागली आहे.

रहाणे विश्वचषक स्पर्धे दरम्यान, आपल्या कुटुंबासह विम्बल्डनच्या मैदानात दिसून आला. त्या फोटोवर तेव्हा तुला क्रिकेटची आठवण येत नाही का अशा कमेंट करत चाहत्यांनी रहाणेला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. मागील काही महिन्यात रहाणेला आपला फॉर्म टिकवता आला नाही. यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.

Leave a Comment