अवघ्या 5 वर्षाच्या मुलाने आगीपासून वाचवले 13 जणांचे प्राण


अमेरिका – आजवर आपण सर्वांनी लहान मुलांच्या शौर्याचे अनेक किस्से ऐकले असतील किंवा पाहिलेही असतील. असाच काहीसा किस्सा नुकताच घडला असून ज्यात एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचे शौर्य पाहून तुम्ही देखील कौतूक कराल. आगीत एक घर पूर्णपणे जळून खाक झाले, पण त्या घरातील सर्वजण मात्र सुखरूप आहेत. घरातील सर्वजण मंडळी त्या चिमुकल्याच्या शौर्यामुळेच ते सुखरुप आहेत. म एस्पिनोसा असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. घरातील किचनमध्ये ज्यावेळी आग लागल्याचे त्याला दिसले त्याने तेव्हा धावत जाऊन याची कल्पना आपल्या कुटुंबीयांना दिली. त्या घरातील सर्वजण त्यानंतर सुखरूप बाहेर पडले. आसपासच्या लोकांना या घटनेची माहिती कळल्यानंतर त्याच्या शौर्याचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.

शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना अमेरिकेतील शिकागो येथे घडली. पहाटे आपल्या घरातील किचनमधून धुर आणि आगीचे लोट जेडेनला दिसले. त्याला त्यावेळी आपल्या घरात आग लागली असल्याचे जाणवले. पण तो मोठ्या धैर्याने आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला आणि याची माहिती त्याने आपल्या कुटुंबीयांना देत घरातून बाहेर पडण्यास सांगितले.

दरम्यान, जेडेनच्या कुटुंबीय निकोल पिपल्स यांनी आज त्याने आम्हाला याची माहिती दिली नसती तर आमच्यातील कोणीही जिवंत दिसले नसते, अशी प्रतिक्रिया दिली. त्या ठिकाणी जेडेन होता म्हणून आज सर्वांचे जीव वाचले. जळण्याचा दुर्गंधही घरात कोणालाही आला नाही, तसेच घरातील फायर अलार्मदेखील बंद असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या मुलाच्या धैर्याचे त्यांच्या वडिलांनीही मनभरून कौतुक केले. आग लागली त्यावेळी त्या घरात 6 मुले आणि 7 मोठी माणसे होती.

Leave a Comment