‘साहो’मधील ‘इन्नी सोनी’ गाण्याचा टीझर रिलीज


जबरदस्त अॅक्शन, स्टंट आणि बिग बजेट असलेला आणि श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपट बऱ्याच काळापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे रिलीज झालेले टीझर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. त्यातच नुकताच चित्रपटातील नव्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

इंटरनेटवर ‘इन्नी सोनी’ असे शीर्षक असलेल्या या गाण्याचा ३६ सेकंदाचा व्हिडिओ रिलीज होताच जबरदस्त हिट झाला आहे. पंजाबी गायक गुरू रंधवा आणि तुलसी कुमार यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. तर २ ऑगस्टला संपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटातील ‘सायको सय्या’ गाणे याआधी रिलीज झाले होते. ‘इन्नी सोनी’ हे एक रोमांटिक गाणे आहे, तर याआधी रिलीज झालेले गाणे डान्स नंबर होते. ऑस्ट्रेलियासोबतच हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. सुजित रेड्डी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी ऐवढे आहे. निल नितीन मुकेश, अरूण विजय, जॅकी श्रॉफ, मंदिरा हेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात असणार आहेत. हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला हिंदी, मल्ल्याळम, तेलुगू आणि तमिळ अशा चार भाषेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment