राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ४ विद्यमान आमदारांचा कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश


मुंबई – अत्यंत खतरनाक अशी ‘केजीएफ 2’ चित्रपटातील अधिरा ही व्यक्तीरेखा आहे. तो यासारख्या भूमिकांचा नेहमीच शोध घेत असतो. खूप पॉवरफुल्ल अशी अधिराची व्यक्तीरेखा आहे. तुम्ही जर अॅव्हेंजर्स पाहिला असेल तर तुम्हाला थानोस माहिती असेल. त्याच्यासारखाच अधिरा आहे. खतरनाक गेटअपसारखीच ही व्यक्तीरेखा खतरनाक आहे. अशाच प्रकारच्या व्यक्तीरेखेच्या शोधात मी होतो, असे संजय दत्त म्हणाला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर इतरही नेते प्रवेश करतील असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक यांनी प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे नेते आणि नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मधुकर पिचड यांनी यावेळी मी आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण यापुढे करायचे आहे आणि माझ्यासहीत या सगळ्यांनीच त्याचमुळे भाजपत प्रवेश केल्याचे म्हटले आहे. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगलं काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची असल्याचेही पिचड यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शरद पवार यांनाही टोला लगावला, शरद पवार असे म्हणत आहेत की ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केले जात आहे, पण काहीही त्यामध्ये तथ्य नाही. जेव्हा तुम्ही शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तर सुधीर मुनगंटीवार यांनी राईट पर्सन इन द राईट पार्टी हे आजचे भाजपतील चित्र असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment