भारताचा जावई होण्याआधी हसन अली म्हणतो, ‘अजून काही खर नाही’


नवी दिल्ली – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली एका भारतीय एका मुलीशी लग्न करणार असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिले होते. पण लग्नाच्या बातमीविषयी हसन अलीने आता मौन सोडले आहे. या लग्नाबाबत ‘अजून काही खरे नाही’, असे त्याने म्हटले आहे.

यासंदर्भात हसन अलीने एक ट्विट केले आहे. त्याने त्यामध्ये म्हटले आहे की, येथे मी एका गोष्टीची पुष्टी देतो की, माझ्या लग्नाबाबत अजून काही खरे नाही. आता फक्त आमच्या कुटुंबाची भेट झाली आहे आणि या विषयावर चर्चा सुरू आहे. तर काही निष्कर्ष निघाले तर नक्कीच त्याची घोषणा केली जाईल.


या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणाची शामिया आरजू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचबरोबर या लग्नाची तयारी जोरदार सुरू असल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले होते. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाने यापूर्वी पाकिस्तानी सासर निवडले होते. पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकशी सानियाने विवाह केला आहे.

Leave a Comment