करण जोहरच्या आखाड पार्टीत झिंगले बॉलीवूड सितारे?


मित्रांसोबत पार्टी करणे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरला खूप आवडते. करणच्या घरी बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास पार्टी करताना दिसतात. करणच्या घरी गत शनिवारी अशीच पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी या लेट नाईट पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण दिसले. या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण युजर्सनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या सेलिब्रिटींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. ज्या स्थितीत व्हिडीओत सर्व स्टार्स दिसत आहेत, ते त्यावरून सगळे नशेत झिंगलेले असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on


व्हिडीओत अभिनेता विकी कौशलला ज्या अवस्थेत पाहिले जाता आहे त्यावरुन त्याने तर ड्रग्ज घेतली असावी, अशी शक्यता युजर्सनी व्यक्त केली आहे. विकी कौशलविरोधात युजर्सनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विकी कौशलचा फोटो शेअर करून अनेकांनी विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला आहे. विकी कॅमेरा समोर येताच आपले नाक स्वच्छ करताना दिसतो, यावरून तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.


हा लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने शेअर केला होता. सगळे स्टार्स या व्हिडिओमध्ये एकत्र बसलेले दिसत आहे. या व्हिडीओत सर्वप्रथम दीपिका दिसते पण या व्हिडीओत तिचा पती रणवीर सिंग कुठेही दिसत नाही. पाठोपाठ दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरही या व्हिडीओत दिसतो. मलायका अरोरा मात्र तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसते. या व्हिडीओत वरूण धवन याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल ही सुद्धा दिसते. त्याचबरोबर झोया अख्तर आणि अयान मुखजी हेही व्हिडीओत दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना करण जोहरने ‘सॅटरडे नाईट व्हाईब्स’ असे कॅप्शन दिले होते. हा सॅटरडे नाईटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.

Leave a Comment