पहिल्यांदाच दाखल होणार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा


नवी दिल्लीः अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला दिल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्याविरोधात आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (प्रिवेंशन ऑफ करप्शन ऍक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे. सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सीबीआयला परवानगी देत आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या विरोधात आहेत.

उत्तर प्रदेशमधील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पदाचा दुरुपयोग करत घोटाळा करण्याचा आरोप न्यायाधीश शुक्ला यांच्यावर आहे. न्यायाधीश शुक्ला यांनी खासगी मेडिकल कॉलेजला लाभ पोहोचवण्यासाठी 2017-18मध्ये प्रवेशाचा काळ वाढवला होता. 2018मध्ये न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जूनमध्ये पत्र लिहून महाभियोगाचा वापर करून न्यायाधीश शुल्का यांना पदावरून दूर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी केली होती.

Leave a Comment