जगातील ही सर्वांत श्रीमंत महिला कोणत्या माध्यमातून कमावते अब्जावधी रुपये?


फ्रान्स्वा बेटनकोर्ट मायर या जगातील सर्वांत श्रीमंत महिला असून त्या जगप्रसिद्ध एका ब्युटी प्रॉडक्ट्स कंपनीच्या मालकीण आहेत. त्या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.


54.5 अब्ज डॉलर ऐवढी लॉरिएल कंपनीच्या या मालकीण बाईंची संपत्ती आहे. तर याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 3.52 लाख कोटी रुपये होईल. मार्च 2019 चा हा आकडा आहे. यात आता आणखीही भर पडलेली असणार आहे. बेटनकोर्ट ही लॉरिएल या फ्रेंच कंपनीचे संस्थापक यूझीन शूलर यांच्या नात असून त्या 1997 पासून लॉरिएलच्या बोर्ड कमिटीत होत्या. त्यावेळी कंपनीच्या प्रमुखपदी लिलियन बेटनकोर्ट होत्या.


फ्रान्स्वा यांच्या लिलियन बेटनकोर्ट या आई असून लॉरिएलची मालकी त्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्स्वा बेटेनकोर्ट मायर याच्याकडे आली. दिवसेंदिवस बेटनकोर्ट यांची संपत्ती वाढत आहे. फोर्ब्सच्या यादीत त्या गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी होत्या.जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिले 15 पुरुष आहेत. 16 व्या स्थानावर लॉरिएलच्या बेटनकोर्ट आहेत.

Leave a Comment