तरूणाने दारूच्या नशेत चक्क घेतला पोलीस अधिकाऱ्याचा किस


सध्या सोशल मीडियावर सध्या पोलीस अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना एका २८ वर्षीय तरूणाने अचानक किस घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली असून यामध्ये एक तरूण दारूच्या नशेत पोलीसाचे किस घेत असल्याचे दिसत आहे. तरूणाच्या या कृत्यानंतर पोलिसाने त्याचा गाल देखील रंगावल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रविवारी (२८ जुलै) रात्री बोनालू उत्सवाच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील घटना घडली आहे. यात लोक रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. तेथून ड्युटीवर असलेला पोलीस अधिकारी जात असतो. तरूण त्या पोलीस अधिकाऱ्याला पकडून चुंबन घेत असल्याचे स्पष्ट व्हिडीओत दिसत आहे. त्याला पोलिसाने तात्काळ धक्का देत कानशिलात लगावल्याचेही दिसत आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असून २८ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. एका खासगी बँकमध्ये तरूण काम करतो. नल्लाकुंता पोलिस स्टेशनचे निरीक्षक के. मुरलीधर म्हणाले की, भारतीय दंड संहिताच्या कलम 353नुसार तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment