जिवंत माकडाला सरडा प्रकारातील कोमोडो ड्रॅगनने गिळले


कोमोडो ड्रॅगन याला सरडा प्रकारातील जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी म्हणून ओळखले जाते. हा कोमोडो ड्रॅगन तीन मीटर लांब आणि ७० किलोपर्यंत याचे वजन असते. असा महाकाय नुसता पाहिला तरी अनेकांच्या धडकी भरते. या ड्रॅगनसमोर कोणत्याही भक्षाचा आपल्या अवाढव्य आकारामुळे आणि ताकदीमुळे निभाव लागत नाही. पक्षी, लहान प्राणी हे ड्रॅगन अगदी एका दमात फस्त करतात. विषारी असा या ड्रॅगनचा चावा असतो. एकदा आपली शिकार त्यांनी तोंडात पकडली ती त्या प्राण्याचा मृत्यू निश्चित असतो असे मानले जाते.

सध्या सोशल मिडियावर कोमोडो ड्रॅगनच्या शिकार करण्याच्या शैलीची झलक दाखवणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोमोडो ड्रॅगन या व्हिडिओमध्ये माकडाला जिवंत गिळताना दिसत आहे. या ड्रॅगनच्या तोंडात माकडाचे अर्धेहून अधिक शरीर असताना सुरु होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ड्रॅगन अवघ्या काही क्षणांमध्ये माकडाला जिवंत गिळताना दिसतो.

प्रामुख्याने इंडोनेशियामधील कोमोडो, रिंका, फ्लोरिस आणि गिली मोटँग या बेटांवर कोमोडो ड्रॅगन हे आढळून येतात. हे ड्रॅगन सामान्यपणे जंगलांमध्ये हरणे, साप आणि डुक्कर खाऊन जगतात. हे ड्रॅगन जास्तीत जास्त २४ किमोमीटर प्रती तास वेगाने पळू शकतात. हे ड्रॅगन आपल्या वजनाच्या ८० टक्क्यांपर्यंत आकार असणाऱ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतात. या ड्रॅगनची लाळ विषारी समजली जाते, ५० हून अधिक प्रकारचे विषाणू ज्यामध्ये असतात. माणसांवर कधीही कोमोडो ड्रॅगन हल्ला करत नाहीत.

Leave a Comment