या प्रेमी युगलामध्ये युवराज सिंह बनला ‘कबाब में हड्डी’


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह सध्या कॅनडा येथील ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळत आहे. मागील महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून युवराजने निवृत्ती जाहीर केली होती. पहिल्या सामन्यात टोरंटो नॅशनल्सचा कर्णधार असलेला युवीने निराशाजनक खेळीनंतर दमदार कमबॅक केले. युवीने ग्लोबल टी-20 लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात एडमॉन्टन रॉयल्स विरुद्ध सामन्यात 21 चेंडूत 35 धावा केल्या. युवीच्या या खेळीच्या जोरावर त्यांच्या संघाने आपला पहिला सामना जिंकला. सध्या सोशल मीडियावर या सामन्याआधीचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका प्रेमी जोडप्यात युवराज सिंह कबाबमध्ये हड्डी बनला.


रॉयल्सचा बेन कटिंग याची टोरोंटो नॅशनल्स आणि एडमॉन्टन रॉयल्स यांच्यातील सामन्याआधी मुलाखत त्याची गर्लफ्रेंड एरिन हॉलेंड घेत असताना या मुलाखती दरम्यान युवराज घुसला आणि मग लग्न कधी आहे, असे म्हणत त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. युवी येथेच थांबला नाही तर मॅच जिंकल्यानंतर जेव्हा हॉलेंडने जेव्हा त्याची मुलाखत घेतली तेव्हा देखील युवीने त्यांची खिल्ली उडवली. युवीला या सामन्यादरम्यान कटिंग याने 35 धावांवर बाद केले. युवराजला सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याच्या बाद होण्याबद्दल विचारले असता त्याने देखील आणखी एक हास्यास्पद प्रतिसाद दिला. बेन कटिंग नावाच्या एका गोलंदाजाने तुम्हाला बाद केले, असे हॉलंडने विचारले, यावर युवराजने उत्तर दिले, हो, तो कोण आहे तो तू त्याला ओळखतोस? हॉलंड म्हणाली, कल्पना नाही, पार्टी उध्वस्त केली त्याने, अशी ती पुढे म्हणाली.

कटिंग आणि युवराज यांच्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स बरोबर एकत्र खेळल्यामुळे चांगले संबंध आहे. दुसरीकडे, ग्लोबल टी-20 स्पर्धेच्या त्याच्या दुसऱ्या सामन्यात युवीने आक्रमक फलंदाजीकेली आणि फिरकी गोलंदाजांची शाळाच घेतली. पाकिस्तानी फिरकी गोलंदाज शादाब खान याच्या एकाच ओव्हरमध्ये युवीने 2 सिक्स आणि 2 चौकार ठोकले. एडमॉन्टन रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत युवीच्या संघाला 191 धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युवी आणि मनप्रीत गोनी आणि अन्य खेळाडूंच्या दमदार खेळीने टोरंटो नॅशनलने सामना जिंकला.

Leave a Comment