रोहितसोबतच्या वादावर विराट म्हणतो ऑल इज वेल!


मुंबई – आम्ही भारतीय क्रिकेट संघाला गेल्या चार वर्षात 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात कोणत्याही प्रकारची दुफळी असती तर हे शक्य झाले असते का? त्यामुळे संघात कोणत्या प्रकारचे वाद नाहीत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ऑल इज वेल! असे वक्तव्य केले आहे. कोहली या पत्रकार परिषदेत विश्वचषका नंतर सुरू झालेल्या रोहित शर्मासोबतच्या वादांच्या चर्चांवर काय मत व्यक्त करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यावर बोलताना विराट म्हणाला की, खूप काही मी पण ऐकले आहे. पण या बातम्या जाणून बजून पेरल्या जात आहेत. कोणाला याचा फायदा होत आहे हे मलाच कळत नाही. आम्ही गेल्या चार वर्षात संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात दुफळी असती तर हे शक्य झाले असते का? अशा चर्चा येणे ही लाजिरवाणी गोष्ट असून हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे कोहली म्हणाला. भारतीय संघाला टॉपवर पोहचवणे हे आमचे ध्येय आहे, असे सांगत विराटने या वादाला पूर्णविराम दिला.

टी-20साठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

वन-डे साठी भारतीय संघ – विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

कसोटीसाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव

Leave a Comment