उर्वशी रौतेलाचा सोशल मीडियावर पुन्हा एकदा जाळ आणि धूर


अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सिनेसृष्टी पेक्षा सोशल मिडियावर तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांमुळे बरीच चर्चेत असते. सोशल मिडियावर तिचे हटके फोटोशूट आणि सेक्सी व्हिडिओज खूप व्हायरलही होतात. फिटनेस बाबतीतही नेहमी आग्रही असलेली उर्वशी आपले एकाहून एक सरस व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिने नुकताच तिचा एक बोल्ड आणि हॉट असा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच तिला आतापर्यंत 21 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत.


तिने या व्हिडिओत काळ्या रंगाची ब्रा घातली असून त्यावर लाल रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. त्यात तिच्या हॉट अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. उर्वशीने याआधीही आपला नवा फिटनेस व्हिडिओ शेअर केला होता. ती जीममध्ये वर्कआऊट करताना या व्हिडिओत दिसत आहे. ती ज्यात चेस्ट एक्सरसाईज करत हातात 12-12 किलोचे डंबल्स उचलताना दिसत आहे.


उर्वशी रौतेला मॉडेल असून तिने 2013 मध्ये ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘रेस-3’, ‘सनम रे’, ‘भाग जॉनी’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटातून काम केले आहे. मात्र आतापर्यंत तिचा कोणताही चित्रपट हिट ठरलेला नाही.

Leave a Comment