आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार भारताचा जावई!


नवी दिल्ली : भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्याशी निकाह केल्यानंतर आता तिच्या पावला पाऊल ठेवत आणखी एक भारतीय मुलगी पाकिस्तानची सून होणार आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटरसोबत हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू निकाह करणार आहे. शामिया पुढच्या महिन्यात पाकचा जलद गोलंदाज हसन अलीसोबत लग्नबद्ध होणार आहे. एअर आमिरातमध्ये शामिया फ्लाईट इंजिनिअर आहे.

दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह होणार आहे. तर, 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास हसन अलीने सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानकडून 2016मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 एकदिवसीय विकेट आहेत. हसन अली शेवटचा सामना विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात खेळला होता.

यासंदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 17 ऑगस्टला शामिया परिवारातील 10 सदस्य दुबईला रवाना होणार आहेत. शामियाचे वडील लियाकत अली यांनी मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. आमचे नातेवाईक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले, असे सांगितले.

शामिया आणि हसन अली यांचे जुने पारिवारिक संबंध आहेत. शामियाचे वडील लियाकत हे पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले आणि त्यांचे बाबा सख्खे भाऊ होते. त्यांचे परिवार फाळणीनंतर भारतात स्थानिक झाले. तर, तुफैले यांचा परिवार पाकिस्तानमध्ये स्थानिक झाल्यामुळे शामिया आणि हसन अली यांची ओळख झाली.

Leave a Comment