बादशाहच्या आवाजातील ‘खानदानी शफाखाना’मधील गाणे रिलीज


‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तत्पर्वी या चित्रपटातील ‘सांस तो लेले’ हे नवे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याची लिंक सोनाक्षीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

रॅपर बादशाहने पंजाबी बोल असलेले हे गाणे गायले आहे. सोनाक्षीच्या एकंदर पात्राची झलक या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणे बादशाहनेच संगीतबद्ध केले आहे. सोनाक्षी ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात लैंगिक समस्यांवर समुपदेशन करताना दिसणार आहे. शिल्पी दासगुप्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मृगदीप लांबा आणि महावीर जैन यांनी केली आहे.

अक्षय कुमार सोबत ‘मिशन मंगल’ चित्रपटातही सोनाक्षी झळकणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर ती सलमान खानसोबत ‘दबंग -३’ चित्रपटातुनही पुन्हा एकदा ‘रज्जो’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

Leave a Comment