संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’चा टीजर रिलीज


बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याचा काल वाढदिवस होता. कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडुन त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.

‘प्रस्थानम’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त करणार आहे. हा ‘प्रस्थानम’ नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टा हे करत आहेत. तेलुगू चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

या चित्रपटाचे मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच संजयने रिलीज केले होते. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. सर्व कलाकारांची झलक या चित्रपटाच्या टीजरमध्ये पाहायला मिळते. संजय दत्तचा या टीजरमधील ‘हक दोगे तो रामायण शुरू होगी, छिनोगे तो महाभारत’ हा डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घतो. आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचा टीजर संजय दत्तने शेअर केला आहे.

संजयशिवाय या चित्रपटात मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमायरा दस्तूर आणि अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. २० सप्टेंबरला ‘प्रस्थानम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबरोबरच संजय दत्त त्याच्या आगामी ‘पानिपत’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच, ‘भूज – द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातही तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment