
भुवनेश्वर – ओडिशाच्या रसगुल्याला भारत सरकारच्या जीआय रेजिस्ट्रेशनकडून मान्यता देण्यात आली असून ओडिशा आणि पश्चिम बंगाल यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून रसगुल्ल्याच्या जीआय टॅगवरुन वाद सुरू होता. आता या वादावर पडदा पडला आहे.
अखेर ओडिशाचा झाला रसगुल्ला
२०१७ साली पश्चिम बंगालला रसगुल्ल्याचा जीआय टॅग देण्यात आला होता. याबद्दल ओडिशाने आक्षेप नोंदवल्यामुळे ओडिशाला याबाबत जीआय रजिस्ट्रारकडून २ महिन्यांचा वेळ देताना ठोस पुरावे देण्यास सांगितले होते. ओडिशाने दिलेल्या पुराव्यानंतर, चेन्नईच्या जीआय रजिस्ट्रारकडून प्रकाशनाद्वारे रसगुल्ला ओडिशाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. रसगुल्ल्यासोबत ओडिशातील प्रसिद्ध जगन्नापुरीची यात्रेचा प्राचीन संबंध आहेत. रसगुल्ल्यासोबत राज्याची परंपरा ही जोडली गेली असल्यामुळे रसगुल्ल्यावर ओडिशाचा हक्क असल्याचे जीआय रजिस्ट्रारकडून स्पष्ट करण्यात आले. ओडिशाचा जीआय टॅग हा २२ फेब्रुवारी २०२८ पर्यंत वैध असणार आहे.
