हिजाब परिधानकरून ही महिला करते रेसलिंग, पुरूषांना देखील करते पराभूत


मलेशियामध्ये प्रो रेसलिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. लोकांना ही स्पर्धा पाहायला आवडते. सध्या प्रो रेसलिंगमधील एक महिला रेसलर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कारण ही महिला हिजाब परिधान करून लढते. या महिलेचे नाव नोर फियोनिक्स डायना असे आहे. ही पहिला महिला आहे जी मलेशिया प्रो रेसलिंगमध्ये जिने पुरूषांबरोबर लढत दिली आहे.. 19 वर्षीय हिजाब परिधान करणारी डायना पहिली रेसलर आहे जी महिला आणि पुरूष दोघांबरोबर लढते.


डायना ट्राउजर्स, हिजाब आणि टॉप घालून रिंगमध्ये उतरताच लोक तिला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. तिने आतापर्यंत अनेक महिलांचा पराभव केला आहे. एवढेच नाही तर तिने आतापर्यंत अनेक पुरूषांचा देखील पराभव केला आहे. डायनाने 2015 पासून रेसलिंग सुरू केली आहे. लहानपणापासूनच तिला फायटर बनायचे होते.


प्रोफेशनल फायटरबरोबरच ती हॉस्पिटलमध्ये काम देखील करते. रिंगच्या बाहेर ती एक शांत मुलगी आहे. तिच्यासाठी येथे पोहचणे खूप अवघड होते. आधी ती मास्क लावून रिंगमध्ये उतरत असे. जेणेकरून तिला कोणी ओळखणार नाही. मात्र मागील वर्षी मॅच हारल्यानंतर ती मास्क काढत हिजाब परिधान करत सर्वांसमोर आली.

View this post on Instagram

3 years ago I made my debut in Kuash Theatre and didn't win. Fast forward 3 years later, I stand in the ring, victorious, as the new @mypwrestling Wrestlecon Champion. I want to say thank you to @ayezshaukatfonseka for believing in me since the day first day I set my foot inside the ring. Without your guidance and coaching, I wouldn't be where I am today. To the fans, thank you. Thank you for all the love and support that you've continuously given to me and MyPW. Thank you so much for attending Fightback last night. It means a lot to us at MyPW. We do this out of passion – we do this because of you guys, the MyPW Nation. Once again, thank you from the bottom of my heart. And to everyone that asked: What's next for Phoenix? Well, to answer that, this is only a beginning. No one has seen what Nor 'Phoenix' Diana is fully capable of. There is a new champion. This is the beginning of a new era. . . . This post cannot end without me thanking the biggest part of my success, The MyPW family. Thank you for taking me in, treating me as your own. Thank you for helping me and guiding me for the last 3 years. I wouldn't have made it this far, I wouldn't have garnered all these skills without you guys.❤️ picture credit @thesundaily / Asyraf Rasid

A post shared by Nor 'Phoenix' Diana 🇲🇾 (@nordianapw) on


ती म्हणाली की, आधी मी फक्त मास्क लावून लढत असे. कारण ती माझी ओळख होती. कारण मला सामाजिक परिणामांची भिती वाटत होती. मात्र मागील वर्षी मी मास्क काढून टाकला. मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.

Leave a Comment