आता पाण्याच्या बॉटलपासून बनणार टी-शर्ट आणि टोपी


रेल्वे स्टेशनवर फेकल्या जाणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलपासून आता टी-शर्ट आणि टॉप्या बनवल्या जाणार आहेत. रेल्वेने याचा यशस्वी प्रयोग बिहारच्या पाटणा रेल्वे स्टेशनवर केला आहे. आता देशातील 2250 रेल्वे स्टेशनवर मशीन लावण्याची तयारी सुरू आहे. या मशीनमध्ये बॉटल रिसायकल करत परत वापर करता येणार आहे. रेल्व बोर्डाच्या एडीजी स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले की, दररोज 16 लाख पाण्याच्या बॉटल्स वापरल्या जातात. या प्रयोगाद्वारे प्रत्येक स्टेशनवर सरासरी 300 बॉटल क्रश केल्या जातील. या हिशोबाने 2250 स्टेशनवर दररोज 7 लाख बॉटल क्रश केल्या जातील. ज्याचे जवळपास 58 हजार टी-शर्ट बनवले जातील.

पुर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी सांगितले की, पाटणा, राजेंद्र नगर आणि दानापूर येथे बॉटल क्रश करण्याची मशीन लावण्यात आलेली आहे. पाटणा स्टेशनवर दररोज 300 बॉटल क्रश केली जात आहेत.

बॉटल्स क्रश करून टी-शर्ट बनवणारी कंपनी बायोक्रशचे सीईओ अजय मिश्रा यांच्यानुसार, याद्वारे बनवले जाणारे टी-शर्ट सामान्य टी-शर्टच्या तुलनेत अधिक टिकाऊ आहेत. एक टी-शर्ट तयार करण्यासाठी जवळपास 12 बॉटल्स वापरल्या जातात.

Leave a Comment