ज्वालामुखीत पडलेल्या पतीचे पत्नीने वाचवले प्राण


तप्त ज्वालामुखीमध्ये 50 फुट खोल आत पडलेल्या आपल्या पतीला पत्नीने साहस दाखवत वाचवले आहे. फ्लोरिडाचे असेलेले क्ले चॅस्टेन आणि त्यांची पत्नी एकैमी हे हनीमूनसाठी कैरेबियन बेटांवरील माउंट लियामायगा पर्वतातील सेंट किट्स या ठिकाणी गेले होते.

दोघांनीही  3700 मीटर शिखर पार केले. मात्र ज्वालामुखी पाहत असताना, क्ले घसरून त्यात पडला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे कोणीच नव्हते.  मात्र त्याच्या पत्नीने घाबरून न जाता साहस दाखवत नवऱ्याला ज्वालामुखीमधून बाहेर काढले व त्यानंतर क्लेला आधार देत ती त्याला 3.2 किलोमीटर लांब असलेल्या बेस कॅम्पपर्यंत घेऊन आली. क्लेच्या डोक्यावर आणि शरीराला अनेक ठिकाणी जख्मा झाल्या आहेत. त्यानंतर तेथून 20 लाख रूपयांमध्ये मेडिकल चार्डट विमान बुक करत त्याला फ्लोरिडा येथे नेण्यात आले. तेथे उपचारानंतर धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघांचेही या घटनेच्या केवळ एक दिवस आधी लग्न झाले होते.

चेस्टेनने सांगितले की, आम्ही शिखरावर होतो. याचदरम्यान ज्वालामुखीमधील हिरवळीने मला आकर्षित केले. मी ज्वालामुखीत उतरू लागलो मात्र घसरल्यामुळे मी गरंगळत जाऊन दगडांवर आपटलो.

I know a lot of you have already heard and any prayers you have made or will make would be greatly appreciated. While on…

Posted by Clay Chastain on Friday, July 19, 2019

एकैमीने सांगितले की, डोक्याला मार लागल्यानंतर क्ले मदतीसाठी जोराने ओरडत होता. मात्र तेथे कोणीच नव्हते. मोबाईल देखील काम करत नव्हते. अशावेळेस मला त्याची मदत करावी लागली व त्याला बेस कॅम्पपर्यंत घेऊन जावे लागले. आम्हाला बेस कॅम्पपर्यंत पोहचण्यासाठी 3 तास लागले.

डॉक्टरांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे हाड तुटलेले नाही. डोक्यावर,नाकाला आणि मानेला इजा झाली आहे. कवटीमध्ये जख्म झाल्याने रक्त खूप गेले आहे. तो लवकरच बरा होईल.

Leave a Comment