ढिंच्याक पूजाने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे याड पळवले


प्रसिद्ध होण्यासाठी एखादी व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बरेच जण काही ना काही उपदव्याप करतच असतात. ‘ढिंच्याक पूजा’ हे त्यापैकीच एक प्रसिद्ध असलेले नाव. अलिकडेच तिचे एक नवे गाणे तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. नेटकऱ्यांना हे गाणे पाहून खरंच वेड लागण्याची पाळी आली आहे.

सोशल मीडियावर ‘सेल्फी मैने ले ली आज’ या गाण्यापासून चर्चेचा विषय बनलेली ढिंच्याक पूजा आता नवे गाणे घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. या गाण्याचे बोल ‘नाच के पागल’, असे असून या गाण्याच्या बोलाप्रमाणेच नेटकऱ्यांना खरोखरच पागल केले आहे.

पूजाचा हा व्हिडिओ भयंकर तर आहेच, पण या गाण्याचे बोल आणि गाण्याची चाल त्यापेक्षाही वाईट असल्याची नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तिच्या ट्विटर अकाऊंटवर बऱ्याच युजर्सनी या गाण्यावर टीका केली आहे. याहीपेक्षा ज्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यांनीच हे गाणे ऐकून दाखवावे, असे आव्हानही नेटकऱ्यांनी केले आहे. हे चौथे ढिंच्याक पूजाचे गाणे असून आत्तापर्यंत तिने ‘सेल्फी मैने लेनी आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’, ही गाणे शेअर केली आहेत.

Leave a Comment