शाहरुखसाठी सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे हा हॅशटॅग


भारतातच नाही तर जगभरात बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खानचे कोट्यावधी चाहते आहेत. तो त्याच्या याच वाढत्या लोकप्रियतेमुळे ग्लोबल स्टार म्हणून ओळखला जातो. पण तो बऱ्याच दिवसापासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. तो त्याच्या ‘झिरो’ चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात न झळकल्यामुळे त्याचे चाहते सध्याच्या घडीला बैचेन झाले आहेत. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी ट्विटरवर चाहत्यांनी एक हॅशटॅग सुरू केला आहे. सध्या हा हॅशटॅग नंबर एकवर ट्रेण्ड करत आहे.

‘#WeMissSRKOnBigScreen’, असा हा हॅशटॅग आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या हॅशटॅगलाही या हॅशटॅगने मागे टाकले आहे. काल धनुषचा वाढदिवस होता. सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसानिमित्त देखील एक हॅशटॅग ट्रेण्ड होत होता. पण शाहरुखसमोर त्याचा हॅशटॅग मागे पडला. शाहरुखच्या लोकप्रियतेचा यावरुनच अंदाज लावता येतो.

शाहरुखने कोणताही चित्रपट ‘झिरो’ चित्रपटानंतर साईन न केल्यामुळे पडद्यावर पाहण्यासाठी त्याला चाहते आतुर झाले आहेत. त्याचे या हॅशटॅगमार्फत चाहते त्याच्यासाठी आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. शाहरुख फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ चित्रपटात झळकणार असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. पण याबाबत शाहरुखने काहीच माहिती दिली नाही.

Leave a Comment