नेटकरी तब्बूच्या अदांवर झाले घायाळ


वयाच्या ४७ व्या वर्षी देखील बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही तिच्या सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ घालत आहे. तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती सध्या अशाच एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे चाहते या फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.


काही दिवसांपूर्वीच तब्बूचा ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार यश मिळवले आहे. तिने अलीकडेच ‘आय दिवा’ या डिजिटल मॅगझीनसाठी एक फोटोशूट केले आहे. तिचा फोटो मॅगझीनच्या कव्हर पेजवर पाहायला मिळतो.


तब्बू या फोटोशूटमध्ये प्रचंड आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे. ती मल्टीकलर सॅटीनच्या ड्रेसमध्ये यामध्ये ती दिसत आहे. प्रसिद्ध डिझायनर प्रशांत वर्मा यांनी हा ड्रेस डिझाईन केला आहे.


सोशल मीडियावर तब्बूने या फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवरही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment