शिल्पाने शेअर केला पाण्यात स्टंट करतानाचा व्हिडीओ


शिल्पा शेट्टीची बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळख आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फिटनेसचे धडे देताना दिसते. त्याचबरोबर ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असते. तिने अलिकडेच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती चक्क पाण्यात स्टंट करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात विशेष म्हणजे तिला पोहता येत नाही. तिनेच या पोस्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

Today was an incredible feeling .. An Honest confession.. “I can’t swim” . I’ve tried so many times to learn, trust me.. but in vain.. So I’m not a water-baby ,but today I felt like a baby in a mother’s womb.. Had to share this with you.. the smile on my face is proof of the bliss I felt to just be able to #float .. for the first time ( with someone’s help ofcourse and no fear) is unparalleled.. To just let go ..of our fears , and trust is what we find hardest.. Lovvved this #watsutherapy an absolute #musttry ♥️😇🧿 @shawellness #shawellnessclinic #stretching #watertherapy #gratitude #happy #keepafloat #joy #letgo #littlejoys #learningnewthings #traveldiaries #spain

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on


या व्हिडिओमध्ये शिल्पा स्विमिंग पूलमध्ये वॉटर थेरपी घेताना दिसत आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे, की खरे सांगायचे तर मला पोहता येत नाही. पोहण्याचा मी खूपदा प्रयत्न केला. पण ते मला जमले नाही. पण आज मला आईच्या कुशीत असलेल्या बाळाप्रमाणे वाटले. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्या चेहऱ्यावरचे हास्य पुरेसे आहे. मी पाण्यात पहिल्यांदाच आणि तेही कुणाच्यातरी मदतीने कोणत्याही भीतीशिवाय अशाप्रकारे वाटर थेरपी घेतल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर शिल्पाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment