उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात; गायीच्या सहवासात राहिल्याने बरा होतो क्षयरोग


डेहराडून – गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो फक्त ऑक्सिजन घेतच नाही तर श्वासाद्वारे ऑक्सिजन सोडतो देखील, असा अजब दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी तसेच श्वासासंबधित समस्या गायीचा मसाज केल्यास बऱ्या होत असल्याचा दावाही केला आहे. आता त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री रावत हे डेहराडून येथील एका कार्यक्रमादरम्यान गायीचे दूध, शेण, गोमुत्र यांचे वैद्यकीय फायदे सांगत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रावत या व्हिडिओमध्ये गाय फक्त ऑक्सिजन घेतच नाही तर सोडते देखील, असे सांगत आहेत. तसेच श्वसनासंबधी आजार गायीचा मसाज केल्याने बरे होतात आणि क्षयरोग देखील गायीच्या सहवासात राहिल्याने बरा होतो, असा अजब दावाही त्यांनी केला आहे. तसेच जेव्हा मी पशुपालन मंत्री होतो या संबंधित वैज्ञानिक परिक्षण तेव्हा केल्याचेही त्यांनी सांगितले.

नेटकऱ्यांनी रावत यांच्या या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली. मुख्यमंत्री कार्यायालयाला या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे स्थानिकांची भावना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अलिकडेच उत्तराखंडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नैनितालचे खासदार अजय भट्ट यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, की बागेश्वर जिल्ह्यातील गुरुड गंगेचे पाणी पिल्यास गर्भवती महिला सेझियन प्रसुती टाळू शकतात. या वक्तव्यानंतर आता मुख्यंमत्र्यांनी गायी संबंधित, असे वक्तव्य करुन नव्या वादाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment