‘या’ हॉट फोटोमुळे चर्चेत आहे अमृता खानविलकर


मराठमोळा चेहरा असलेली लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या खतरों के खिलाडीच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होणार असल्यामुळे चर्चेत आहे. त्यानंतर तिने केलेले फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या चांगल्याच पसंती उतरत आहे. या फोटोंवर ‘हॉटनेस आहे गं बाई’ अशी कमेंट आर. जे. मलिष्काने लिहिली आहे.


खतरों के खिलाडीच्या दहाव्या सीझनमध्ये आर. जे. मलिष्का देखील असेल, अशीही बातमी आली आहे. मध्यंतरी अमृताने तिच्या मालदीव व्हेकेशनचे हॉट फोटो शेअर केले होते. रोहित शेट्टी नेहमीप्रमाणे खतरों के खिलाडीच्या सीझन 10 चे सूत्रसंचालन करणार आहे. याचे शूटिंग ऑगस्टमध्ये बल्गेरियात सुरू होईल, असे सांगितले जात आहे.


अमृता म्हणाली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत की, शोच्या टीमसोबत सध्या बोलणी सुरू असून अजून पर्यंत कोणतीच गोष्ट निश्चित करण्यात आलेली नाही. अमृता शिवाय ये है मोहब्बतें मालिकेतील अभिनेता करण पटेलनेही या शोसाठी हो म्हटले आहे. गेले दोन सिझन या रिअलिटी शोला चांगला टीआरपीमुळे मेकर्सने 10 वा सीझन करण्याचा विचार केला.

View this post on Instagram

#loungingaround @thesunsiyamirufushi #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on


खतरों के खिलाडीचा आठवा सिझन अभिनेता शंतनू महेश्वरीने जिंकला तर नववा सिझन कोरिओग्राफर पुनीत पाठकने जिंकला होता. अमृता सध्या स्टार प्रवाहवरील जीवलगा मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरसोबत काम करत आहे. या व्यतिरिक्त अमृताने राजी आणि सत्यमेव जयते या चित्रपटांत काम केले होते.

View this post on Instagram

#casuallywalking #onthewhitesand #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

Leave a Comment