तुमच्या फोनमध्ये गुगलची होत असलेली हेरगिरी अशी थांबवा


दिवसागणिक इंटरनेट युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे. टेलिकॉम कंपनींकडून सध्याच्या घडीला मोफत इंटरनेट आणि कमी दरात मिळत असल्याने इंटरनेटचा वापर अनेकजण करत आहेत. प्रत्येकजण आपला अधिक वेळ आज सोशल मीडिया आणि ब्राऊझिंगमध्ये घालवतात. पण युजर्ससाठी यामुळे एका धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटवर तुम्ही तुमचा सर्वाधिक वेळ घालवत असल्यामुळे गुगलला तुमची प्रत्येक माहिती मिळत आहे. प्रत्येक युजर्सवर गुगलची पाळत आहे. तुमची सर्व माहिती गुगलकडून इतर छोट्या-मोठ्या कंपनींना विकली जात असल्याचा आरोपही केला जात असल्यामुळे याचा दुष्परिणामही युजर्सला भोगावा लागू शकतो.

मोठ्या प्रमाणात सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर केला जातो. इंटरनेट आज गुगल अॅपचा सर्चपासून ते कॅलेंडर, स्मार्ट असिस्टंट, मॅप्स आणि लोकेशन या सर्वांसाठी युजर्स वापर करतो. गुगलला त्यामुळे युजर्सची सर्व माहिती मिळत आहे. युजर्सला काय खायला आवडते, तो कोणत्या ट्रेन किंवा फ्लाईटने प्रवास करत आहे. तो अधिक वेळ कुठे घालवतो, इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतो, कोणत्या ठिकाणी फिरायला जातो या सर्व गोष्टींची माहिती गुगलला मिळत आहे.

कॅम्ब्रिज अॅनालिटिका स्कँडलसारखी घटना समोर आल्यानंतर युजर्सलाही डेटा चोरीची भीती वाटत आहे. पण या पासून स्वत:चे सरंक्षण कसे करता येईल याचा सल्ला आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही तुम्हाला गुगलचा वापर बंद करण्याचा सल्ला देत नाही. पण काही ट्रिकच्या माध्यमातून आपण गुगल आपल्यावर ठेवत असलेली पाळत रोखू शकतो. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही बदल सेटिंगमध्ये करण्याबाबत सांगणार आहोत.

जीमेलचा सर्वाधिक युजर्स वापर करतात. तर काही युजर्सचे दोन ते तीन ईमेल अकाऊंट असतात. प्रत्येक युजर्सच्या ईमेलवरही पाळत आहे. कोणता मेल तुम्ही ओपन केला किंवा कोणता मेल तुम्ही सर्वाधिक वेळा पाहिला आहे. तुम्ही ही पाळत रोखण्यासाठी जीमेल अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन स्क्रोल करा. त्यानंतर एक इमेज दिसेल. ‘Ask before displaying external images’ त्यामध्ये सिलेक्ट करा. तुम्हाला आता फोटो दिसणार नाही. त्यामुळे पिक्सल ट्रॅक केले जाऊ शकत नाही आणि ईमेल ट्रॅकिंगही केली जाऊ शकत नाही.

तुम्ही कधी केव्हा कुठे गेला आणि तिथे किती वेळ घालवला, याची सर्व माहिती गुगलला आहे. ही माहिती गुगलला आपल्या मोबाईलमधील लोकेशन हिस्ट्रीमुळे मिळते. myaccountgoogle.com वर त्यासाठी तुम्ही जा. त्यानंतर गुगल अकाऊंटमध्ये डेटा आणि पर्सनलायझेशननंतर लोकेशन हिस्ट्रीमध्ये जा. लोकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन ते Paused करा.

आता फक्त सर्ज इंजिन नाही, तर एक स्मार्ट असिस्टंटही गुगलमध्ये आहे. व्हॉईस कमांड देऊनही तुम्ही गुगल सर्च करु शकता. विशेष म्हणजे गुगलवर तुम्ही काही म्हटले तर गुगल त्याची रेकॉर्डिंग सेव्ह करतो. तुम्हाला जर हे नको हवे असेल तर गुगल माय अकाऊंटवर जाऊन तुम्ही डेटा आणि पर्सनलायझेशनमध्ये जा. तिथे व्हॉईस अँड ऑडियो अॅक्टिव्हिटीवर क्लिक करा आणि Paused करा.

जीमेलचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुमची पर्चेस हिस्ट्री म्हणजे वस्तू खरेदीही गुगल ट्रॅक करत आहे. ही हिस्ट्री डिलीट करण्यासाठी गुगल माय अकाऊंटवरील जीमेल कर्न्फमेशनमध्ये जा. जे काही खरेदी केलेल्या वस्तूंची लिस्ट येथे असेल ती डिलीट करा. तुम्ही यासाठी त्या वस्तूवर क्लिक करा. यानंतर रिमूव्ह पर्चेस करा. हे तुम्हाला प्रत्येकवेळी करावे लागेल. गुगुलवर तुम्ही काही सर्च केले, तर गुगल ते शब्द ट्रॅक करतो. शब्द ट्रॅक केल्यानंतर त्या संबधित जाहीरात गुगल तुम्हाला दाखवतो. यासाठी तुम्ही DuckDuckGo सारख्या सर्च इंजिनचा वापर करु शकता. हे सर्ज इंजिन तुम्हाला ट्रॅक करत नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आपले अकाऊटं हॅक करण्यापासून तुमचा बचाव करु शकता. टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन यासाठी ऑन करावे लागणार आहे. अशा प्रकारे अकाऊंटमध्ये नवीन डिव्हाईसने लॉग-ईन केल्यावर तुमच्या नंबरवर ओटीपी येईल. तुम्हाला या ओटीपीशिवाय लॉग ईन करता येणार नाही. गुगल माय अकाऊंट पेजवर यासाठी जा. यानंतर सिक्युरिटीमध्ये जा. टू स्टेप व्हेरिफिकेशन येथे निवडा आणि पुन्हा पासवर्ड डायल करा. आता ऑथेन्टिकेटर सेटअप करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या स्टेप फॉलो करा.

आपला डेटा गुगलकडून विकला जातो. तुम्ही यासाठी तुमचा डेटा लपवू शकता. aboutme.google.com वर यासाठी तुम्ही जा. तुम्हाला येथे तुमच्याबद्दल दिसत असलेल्या वेगवेगळ्या माहितीवर आणि सेटिंगने ‘Hidden from other users सिलेक्ट करावे लागले.

Leave a Comment