
गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु दूर आहे. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे अनेक फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सोशल मीडियात व्हायरल होत आहे बिपाशाचा २० वर्षांपूर्वीचा बिकिनी लूक
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये आजही बिपाशाचे नाव आवर्जुन घेतले जाते. बिपाशाने नुकताच तिच्या कॉलेजच्या दिवसांतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बिपाशा या फोटोमध्ये टॅन लूकमध्ये दिसत असून पुन्हा टॅन लूक हवा असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
तिने जवळपास २० वर्षांपूर्वीचा मॅग्जिन कव्हर पेजसाठीचा फोटोही शेअर केला आहे. ती या फोटोमध्ये स्विमसूटमध्ये दिसत असून तिच्या पहिल्या बिकिनी शूटचा फोटो असल्याचे तिने म्हटले आहे.
बिपाशाच्या जुन्या लूकला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटातून बिपाशा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा पती करण सिंह ग्रोवरही त्या चित्रपटात होता. दोघे या चित्रपटानंतर विवाहबंधनात अडकले. बिपाशा लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण बिपाशा आता सिनेसृष्टीत केव्हा पुनरागमन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
