कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत अक्षयने शेअर केला जवानांचा व्हिडिओ


आजवर अनेक सामाजिक आणि देशभक्तीवर आधारित चित्रपटांतून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर तो त्याच्या रिअल लाईफमध्ये देखील जवानांच्या कुटुंबीयांना आणि गरजूंना आर्थिक मदत करत असल्याचे वृत्त आम्ही बहुतेकवेळा आम्ही दिले आहे. आता अक्षयने कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


तीन जवान या व्हिडिओमध्ये अक्षयच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणे गाताना दिसत आहेत. पण त्यांनी या गाण्यातील शब्द बदलले आहेत. देश मेरे तू जीता रह, तूने शेर के बच्‍चे पाले हैं। इक लाल हुआ बलिदान तो क्‍या, सौ लाल तेरे रखवाले हैं, असे या गाण्यात ते म्हणत आहेत.

हाच व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारने म्हटले, माझा आजचा दिवस मन हेलवणाऱ्या या व्हिडिओने खास बनवला. तुमचे छोटसे कार्य जेव्हा योग्य लोकांपर्यंत पोहोचते, यापेक्षा जास्त अजून काय हवे. आपल्या जवानांना शेकडो सलाम, असे म्हणत भारत के वीर असा हॅशटॅग त्याने या ट्विटला दिला आहे.

Leave a Comment