62 कलाकारांचे 49 मान्यवरांनी मोदींना लिहिलेल्या पत्राला प्रत्युत्तर


नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत आणि प्रसुन जोशी यांच्यासह 62 कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचीगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी लिहिलेल्या पत्राला पत्राद्वारेच टीका केली आहे. काश्मीरमध्ये जेव्हा शाळा बंद करण्यात आल्या, आदिवासींच्या हत्या झाल्या तेव्हा हे लोक कुठे होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

देशभरात ठराविक घटनांचा उल्लेख करुन मुद्दाम सरकारविरोधी वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने ते मोदींना पत्र लिहिण्यात आले आहे. देशविरोधी नारे जवाहरलाला नेहरु विद्यापीठामध्ये लागले. आदिवासी आणि गरीब लोकांच्या हत्या झाल्या. काश्मीरमध्ये शाळा बंद केल्या गेल्या, ही स्वंयघोषित संविधान रक्षणकर्ती लोक तेव्हा का गप्प होती. त्या 49 कलाकारांनी चुकीच्या हेतूने आणि राजकीय खेळीतून मोदींना पत्र पाठवले असल्याचे उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यामध्ये कंगना राणावत, सोनल मानसिंह, प्रसुन्न जोशी , स्वप्न दास गुप्ता, अशोक पंडीत, मधुर भंडारकर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, मालिनी अवस्थी, मनोज जोशी, मनोज दीक्षित, संध्या जैन, डॉ. विक्रम संपत, प्रतिभा प्रल्हाद यांच्यासाख्या कलाकार आणि लेखकांचा समावेश आहे.

देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात 23 जुलैला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता.

Leave a Comment