कपिल शर्मा आणि कंपनी देणार ‘अँग्री बर्डस २’च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज


कपिल शर्माला कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखले जाते. आता तोच कपिल कॉमेडीनंतर आपल्या आवाजानेही प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. तो कोणत्या गाण्याला नाही तर एका चित्रपटाला हा आवाज देणार आहे.


कपिल आपला आवाज हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅनिमेटड चित्रपट अँग्री बर्डच्या दुसऱ्या भागाच्या हिंदी व्हर्जनसाठी देणार आहे. या चित्रपटांतील पात्रांना कपिलशिवाय कपिल शर्माच्या टीममधील इतर सदस्यही आवाज देणार आहेत. यात अर्चना पुरन सिंह आणि किकू शारदा यांचाही समावेश आहे.

कपिल या चित्रपटातील रेड नावाच्या पात्रासाठी, झेटा नावाच्या पात्राला अर्चना तर लिओनार्डला किकू आपला आवाज देणार आहे. हा चित्रपट येत्या २३ ऑगस्टला हिंदी, तेलुगू आणि तमिळसह इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिली आहे.

Leave a Comment