‘फास्ट अँड फ्यूरिअस – हॉब्ज अँड शॉ’चा हिंदी ट्रेलर रिलीज


जगभरात सुमारे ५ बिलीयन डॉलरची कमाई कमवत इतिहास रचणाऱ्या फास्ट अँड फ्युरिअसच्या ८ भागानंतर फ्यूरिअस सिरीजचा नवा चित्रपट ‘फास्ट अँड फ्यूरिअस – हॉब्ज अँड शॉ’ पुढील महिन्याच्या २ तारखेला रिलीज होणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदीसह इंग्लिश, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.

या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाचा नुकताच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जबरदस्त अॅक्शन सीनसोबतच बाईक आणि कार स्टंटही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.


या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि जेसन स्टॅथम ल्यूक हॉब्स आणि रॉक्स शॉ या भूमिकेत पुन्हा दिसणार असून ड्वेन जॉन्सन यात अमेरिकेच्या प्रामाणिक सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून स्टॅथम अपराध्याच्या भूमिकेत आहे. फास्ट अँड फ्यूरिअस चित्रपटाचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी हा नवा भाग पर्वणी ठरणार आहे.

Leave a Comment