‘जबरिया जोडी’मधील अरिजीत आवाजातील तुम्ही ऐकले आहे का ?


‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि परिणीती चोप्रा ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यातच आता या चित्रपटातील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद याआधी रिलीज झालेल्या खडके ग्लासी, जिला हिलेला, ढूंढे अखियां, या गाण्यांना मिळाला. आता, काही कारणाने परिणीती आणि सिद्धार्थच्या नात्यात आलेल्या दुराव्यावर चित्रीत केलेल्या या नव्या गाण्याचे शीर्षक ‘की होंदा प्यार’ असे आहे. दोघेही यात एकमेकांसोबतच्या जुन्या आठवणींत रमलेले दिसतात. अरिजीत सिंहने या गाण्याला आवाज दिला आहे.

परिणीती बबली यादव तर सिद्धार्थ अभय सिंह नावाच्या तरूणाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. यात अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, चंदन रॉय सान्याल या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. प्रशांत सिंग यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Comment