प्रियंकाच्या ‘द स्काय इज पिंक’चा फर्स्ट लूक रिलीज


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा लूक शेअर केला आहे.


यावर्षीच्या टोरंट फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियंकाच्या या चित्रपटाचा प्रिमीयर होणार आहे. प्रियंकाशिवाय या चित्रपटात फरहान अख्तर आणि जाहिरा वसीम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून चित्रपटाच्या पोस्टरमध्ये या सर्वच कलाकारांचे पाठमोरे लूक पाहायला मिळत आहेत. समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त होताना बदललेल्या आकाशाच्या रंगाकडे हे कलाकार पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केले असून आरएसव्हीपी आणि रॉय कपूर फिल्मस यांची निर्मिती असणार आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे.

Leave a Comment