‘अर्जुन पटियाला’मधील आणखी एक हृदयस्पर्शी गाणे रिलीज


लवकरच ‘अर्जुन पटियाला’ चित्रपटातून पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि क्रिती सेनॉनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिलजीत चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत क्रिती झळकणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आल्यानंतर चित्रपटातील काही गाणीही रिलीज करण्यात आली असून यातील दिल तोडेया हे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याची सुरूवात क्रितीच्या एका इमोशनल डायलॉगपासून होते. क्रिती आणि दिलजीतची एकमेकांपासून दूर गेल्यावर होणारी घालमेल यात पाहायला मिळते.

दिलजीतने स्वतः या गाण्याला आवाज दिला आहे. तर गाण्याचे बोल गुरू रंधवाने लिहिले आहेत. दरम्यान या चित्रपटात क्रिती आणि दिलजीतशिवाय वरूण शर्मा, सिमा पहवा, मोहम्मद अय्यूब आणि रोनीत रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मोहित जुगराज यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment