‘बाटला हाऊस’चे आणखी एक पोस्टर तुमच्या भेटीला


लवकरच ‘बाटला हाऊस’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता जॉन अब्राहम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर हा चित्रपट आधारलेला असणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


जॉनच्या या चित्रपटातील फोटो या १५ ऑगस्टला सत्य जाणून घ्या, असे कॅप्शन देत शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये बाटला हाऊस प्रकरणामागे असणारी सत्य कथा उलगडण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखील अडवाणी यांनी केले आहे.

दिल्ली पोलीस आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांमध्ये २००८ साली चकमक झाली होती. आतिफ अमिन आणि महम्मद साजिद हे दहशतवादी यात ठार झाले, तर या चकमकी दरम्यान विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना वीरमरण आले. पण चकमकीत मारले गेलेले लोक हे दहशतवादी नसून ते विद्यार्थी होते, असा दावा नंतर अनेकांनी केला होता. ज्यामुळे या एनकाऊंटविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली होती. या सर्वादरम्यान विवादात अडकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आणि त्या रात्रीची खरी बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.

Leave a Comment