‘साहो’चे नवे कोरे पोस्टर रिलीज


लवकरच ‘साहो’ चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली असली तरी आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


श्रद्धा आणि प्रभासच्या प्रेमाची खास झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. जी प्रेक्षकांची मने जिंकण्यासोबतच चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारी आहे. प्रेक्षकांना आतापर्यंत चित्रपटातील अॅक्शन सीनचेच व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळाले होते. पण चित्रपटातील लव्हस्टोरीचा अँगल सांगणारे हे पोस्टर आहे.

श्रद्धा आणि प्रभासशिवाय सुजित यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि महेश मांजरेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment