सोशल मीडियात व्हायरल होत आहे विद्युत जामवालचा अनोखा स्टंट


सोशल मीडियावर एखादा ट्रेण्ड नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. या ट्रेण्डमध्ये सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण सहभागी होत असतात. इन्स्टाग्रामवर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. विद्युतने हातात अंडे धरुन विटांवर वार केला, यात विटा फुटल्या, पण त्याच्या अंडे फुटले नाही.

विद्युतने आपल्या या पोस्टला पाचव्या जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय चित्रपट सप्ताहाला हजेरी लावत आहे. जॅकी चॅन आणि त्यांच्या चाहत्यांना मी हे समर्पित करतो, असे कॅप्शन दिले आहे. विटांवर विद्युतने हात मारला, त्याच्या प्रहारामुळे विटांचा चक्काचूर झाला, पण साधा धक्काही अंड्याला लागला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


विद्युतच्या व्हिडिओला अवघ्या एका दिवसातच साडेबारा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी विद्युतच्या या अनोख्या कौशल्याचे भरभरुन कौतुकही केले आहे. सोशल मीडियावर विद्युत जामवाल नेहमीच अॅक्टिव्ह असतो. त्याने वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तो नेहमीच फिटनेस व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससमोर नवनवी आव्हाने ठेवत असतो.

Leave a Comment