यामुळे आपल्या आई-वडीलांचे फोटो पाहत नाही सनी लिओन


बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनसाठी पॉर्न स्टार ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपस्कर नव्हता. या दरम्यानच्या काळात पॉर्न स्टार ही ओळख मिटवून सनी लिओन खंबीरपणे उभी राहिली आणि तिने बॉलिवूड अभिनेत्री ही नवी ओळख निर्माण केली. तिचे खासगी आयुष्य सनीने कधीच लपवले नाही. उलट जे आहे ते तिने उघडपणे जगासमोर मांडले.

View this post on Instagram

Love being a mermaid!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


तिने असाच एक मोठा खुलासा एका ताज्या मुलाखतीतही केला. तिने या मुलाखतीत माझ्या आई-वडिलांचे फोटो मी कधीच पाहत नसल्याचे सांगितले. ती असे का करते याचे देखील उत्तर तिने आपल्या या मुलाखतीत दिले. त्याचबरोबर तिच्या आयुष्यावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ या वेब सीरिजवरही भाष्य केले.

View this post on Instagram

Hanging out on set…

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


माझ्या आयुष्यावर वेबसीरिज बनवण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण ही वेबसीरिज बनवण्याचा निर्णय मी घेतला. कारण यात केवळ माझा पॉर्न स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास नव्हता तर माझा अख्खा जीवनप्रवास होता. लोकांची मते बदलणे शक्य नाही. पण लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या वेब सीरिजमुळे बदलेल, असे मला वाटले. या वेबसीरिजमध्ये माझे बालपण, माझा संघर्ष, अ‍ॅडल्ट स्टार बनण्याचा मी घेतलेला निर्णय, यानंतरचा संघर्ष हे सगळे काही होते.

View this post on Instagram

Mood 😍

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


मी स्वत:च या वेबसीरिजमध्ये काम केल्यामुळे मला याचे शूटींग करताना पुन्हा भूतकाळात जावे लागले. त्या कटू आठवणी पुन्हा जगाव्या लागल्या, असे ती म्हणाली. माझ्या आईवडिलांचे फोटो मी कधीच पाहत नाही. कारण त्यांचे फोटो पाहिल्यावर मला त्यांची आठवण येते. पण वेबसीरिज शूट करताना सेटवर त्यांचे फोटो होते. त्यामुळे हे शूट माझ्यासाठी अतिशय कठीण होते, असेही तिने सांगितले.