
नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री आणि मॉडेल मंदना करीमी चर्चेत असते. मंदनाने नुकतेच एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. मंदनाने या फोटोमध्ये हॉट आणि बोल्ड अशा पोज दिल्या आहेत. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तिच्या हॉट आणि हटके अशा फोटोतील पोजमुळे चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस तिच्या फोटोवर पडत आहे.
मंदना करीमीची सोशल मीडियावर ग्रेट ग्रँड मस्ती
आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडिया माध्यमांवर मंदनाने याआधीही आपले हॉट फोटो अपलोड केले होते. युट्यूबवर मंदनाचे हॉट व्हिडीओही आहेत. नेहमीच सोशल मीडियावर हटके असे फोटो मंदना पोस्ट करत असते.
एफएचएम नावाच्या मासिकासाठी हे फोटोशूट मंदनाने केले आहे. तिने यामध्ये एकापेक्षा एक अशा हटके पोज दिल्या आहेत. तिच्या अनेक चाहत्यांना हे फोटो घायाळ करत आहेत.
दरम्यान, मंदना बिग बॉस सीझन 9 कार्यक्रमातून घराघरात पोहचली. आतापर्यंत भाग जॉनी, क्या कुल है हम 3 या चित्रपटात तिने काम केले आहे. लवकरच एक इराणी चित्रपट ‘कोकाकोला’मध्ये अभिनेत्री सनी लिओनीसोबत मंदना दिसणार आहे.
